भजनी मालिका
← भजनांकडे परत

देखोनि पुराणिकांची दाढी । रडे स्फुंदे नाक ओढी

dekhoni puranikanchi dadhi | rade sphunde nak odhi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देखोनि पुराणिकांची दाढी । रडे स्फुंदे नाक ओढी ॥१॥ प्रेम खरें दिसे जना । भिन्न अंतरीं भावना ॥ध्रु.॥ आवरीतां नावरे । खुर आठवी नेवरे ॥२॥ बोलों नयें मुखावाटां । म्हणे होतां ब्यांचा तोटा ॥३॥ दोन्ही सिंगें चारी पाय । खुणा दावी म्हणे होय ॥४॥ मना आणितां बोकड । मेला त्याची चरफड ॥५॥ होता भाव पोटीं । मुखा आलासे शेवटीं ॥६॥ तुका म्हणे कुडें । कळों येतें तें रोकडें ॥७॥