भजनी मालिका
← भजनांकडे परत

देखोनि हरखली अंड । पुत्र जाला म्हणे रांड । तंव तो जाला भांड । चाहाड चोरटा शिंदळ

dekhoni harakhali and | putra jala mhane rand | tanv to jala bhand | chahad chorata shindal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देखोनि हरखली अंड । पुत्र जाला म्हणे रांड । तंव तो जाला भांड । चाहाड चोरटा शिंदळ ॥१॥ जाय तिकडे पीडी लोकां । जोडी भांडवल थुंका । थोर झाला चुका । वर कां नाहीं घातली ॥ध्रु.॥ भूमि कांपे त्याच्या भारें । कुंभपाकाचीं शरीरें । निष्ठुर उत्तरें । पापदृष्टी मळिणचित्त ॥२॥ दुराचारी तो चांडाळ । पाप सांगातें विटाळ । तुका म्हणे खळ । म्हणोनियां निषिद्ध तो ॥३॥