भजनी मालिका
← भजनांकडे परत

देखीचा दिमाख शिकोनियां दावी । हि†ऱ्या ऐसी केवीं गारगोटी

dekhicha dimakh shikoniyan davi | hi†rya aisi kevin garagoti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देखीचा दिमाख शिकोनियां दावी । हि†ऱ्या ऐसी केवीं गारगोटी ॥१॥ मर्यादा ते जाण अरे अभागिया । देवाच्या ऐसिया सकळ मूर्ती ॥ध्रु.॥ काय पडिलासें लटिक्याचे भरी । वोंवाळुनि थोरी परती सांडीं ॥२॥ तुका म्हणे पुढें दिसतसे घात । करितों फजित म्हणउनी ॥३॥