भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहीं शत्रु वसती दुर देशीं । येतां बहु दिवस लागती तयांसी

dehin shatru vasati dur deshin | yetan bahu divas lagati tayansi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देहीं शत्रु वसती दुर देशीं । येतां बहु दिवस लागती तयांसी ॥१॥ बाह्म शत्रुंचें अल्प दुःख । मनःशत्रुंचें वर्म अशेख ॥२॥ आसनीं शयनीं एकान्तीं । जपीं अथवा ध्यानस्थिती ॥३॥ ऐशिया पणाचे भुलले हावे । एका जनार्दनीं नेणती देवें ॥५॥