भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहिचेनि सुखें सुखावत । सुख सरतां दुःख पावत

dehicheni sukhen sukhavat | sukh saratan duhkh pavat

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देहिचेनि सुखें सुखावत । सुख सरतां दुःख पावत ॥१॥ ऐशी आहे बरोबरी । वायां शिणती निर्धारी ॥२॥ सुख दुःख ते समान । मुळींचेच हे दोन्हीं जाण ॥३॥ एकाजनार्दनीं सुखदुःख । अवघा जनार्दन एक ॥४॥