भजनी मालिका
← भजनांकडे परत

देह नाशिवंत अभ्राची साउली । तैशी परी बोली संसाराची

deh nashivant abhrachi sauli | taishi pari boli sansarachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देह नाशिवंत अभ्राची साउली । तैशी परी बोली संसाराची ॥१॥ जळगारीं जैसें उदक नाथिलें । कां मृगजळ पसरलें चहुंकडे ॥२॥ परुषाची छाया वाउगाचि भास । चोराचा पैं लेश काय तेथें ॥३॥ रज्जु देखतांचि भासतसे सर्प । एका जनार्दनीं दर्प संसाराचा ॥४॥