भजनी मालिका
← भजनांकडे परत

देह मृत्याचें भातुकें । कळों आलें कवतुकें

deh mrutyachen bhatuken | kalon alen kavatuken

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देह मृत्याचें भातुकें । कळों आलें कवतुकें ॥१॥ काय मानियेलें सार । हें चि वाटतें आश्चर्य ॥ध्रु.॥ नानाभोगांची संचितें । करूनि ठेविलें आइतें ॥२॥ तुका म्हणे कोडीं । उगवून न सकती बापुडीं ॥३॥