भजनी मालिका
← भजनांकडे परत

देह लावी हरिकीर्तनीं । येर कारणीं पडुं नको

deh lavi harikirtanin | yer karanin padun nako

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देह लावी हरिकीर्तनीं । येर कारणीं पडुं नको ॥१॥ सोडी संसाराचा छंद । कीर्तनीं गोविंद आठवा ॥२॥ होई दास संतचरंणीं । पायवणी वंदी तूं ॥३॥ काया लावी देवाकडे । येर सांकडें वारिल ॥४॥ अनुमोदन सर्वाठायीं । मन देई हरिचरणीं ॥५॥ म्हणे जनार्दनाचा एका । काया वाचा भाविका सांगत ॥६॥