भजनी मालिका
← भजनांकडे परत

देह जाईल तरी जावो राहील तरी राहो । दोराचिया सर्पा जिणें मरणें न वावो

deh jail tari javo rahil tari raho | dorachiya sarpa jinen maranen na vavo

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देह जाईल तरी जावो राहील तरी राहो । दोराचिया सर्पा जिणें मरणें न वावो ॥१॥ आम्ही जिताची मेलों जिताची मेलों । मरोनियां जालों जीवेविण ॥२॥ मृगजळाचें जळ भरलें असतां नाहीं । आटलिया तेथें कोरडें होईल काई ॥३॥ एका जनार्दनीं जगाचि जनार्दन । जिणें मरणें तेथें सहज चैतन्यघन ॥४॥