भजनी मालिका
← भजनांकडे परत

देह जाईल जाईल । यासी काळ बा खाईल

deh jail jail | yasi kal ba khail

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देह जाईल जाईल । यासी काळ बा खाईल ॥१॥ कां रे नुमजसी दगडा । कैचे हत्ती घोडे वाडा ॥ध्रु.॥ लोडें बालिस्तें सुपती । जरा आलिया फजिती ॥२॥ शरीरसंबंधाचें नातें । भोरड्या बुडविती सेतातें ॥३॥ अझुनि तरी होई जागा । तुका म्हणे पुढें दगा॥४॥