भजनी मालिका
← भजनांकडे परत

देह अवसानीं काळाची तों संधी । पोहोंचली आधीं येवोनियां

deh avasanin kalachi ton sandhi | pohonchali adhin yevoniyan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देह अवसानीं काळाची तों संधी । पोहोंचली आधीं येवोनियां ॥१॥ कोण सोडवील तुजलागीं बापा । श्रीराम जपा लवलाही ॥२॥ छाया जैशी हाले नाशिवंत खरी । तैशीच ही परी देहाचिया ॥३॥ एका जनार्दनीं भुलूं नको माया । काळ तो लवलाह्मा नेईल बापा ॥४॥