भजनी मालिका
← भजनांकडे परत

देह अशाश्वत नाम हें शाश्वत । म्हणोनि विवादत श्रुति शास्त्रें

deh ashashvat nam hen shashvat | mhanoni vivadat shruti shastren

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देह अशाश्वत नाम हें शाश्वत । म्हणोनि विवादत श्रुति शास्त्रें ॥१॥ नाशिवंतासाठीं राननाम तुटी । ससाराची आटी करिती जन ॥२॥ जडत्व पाषाण नामेंचि तरले । अभेदें भरले देह ज्याचें ॥३॥ शुद्धभाव पोटीं वासना निर्मळ । संकल्प बरळ नव जाती ॥४॥ एका जनार्दनीं दृढ हा निश्चय । राम सखा होय तयालागीं ॥५॥