भजनी मालिका
← भजनांकडे परत

दयाळु उदार पंढरीराव । भाकितां कवि पुरवी इच्छा

dayalu udar pandharirav | bhakitan kavi puravi ichchha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दयाळु उदार पंढरीराव । भाकितां कवि पुरवी इच्छा ॥१॥ ऐसा याचा अनुभव । आहे ठाव मागोनियां ॥२॥ जे जे होती शरणागत । पुरवी आर्त तयाचें ॥३॥ उपमन्यु ध्रुव बाळ । दिधलें अढळपद त्यांतें ॥४॥ पुराणीं तो व्यासें बहु । वर्णिलें दावुं कासया ॥५॥ एका जनार्दनीं एकचि भाव । तेणें देव तुष्टता ॥६॥