भजनी मालिका
← भजनांकडे परत

दत्त देतां आलिंगन । कैसे होताहें अभिन्न

datta detan alingan | kaise hotahen abhinna

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दत्त देतां आलिंगन । कैसे होताहें अभिन्न ॥१॥ स्वलीला स्वरुपता । तिन्हीं दावी अभिन्नता ॥२॥ लाघवी श्रीदत्त । देवभक्त आपणचि होत ॥३॥ मीचि जनार्दन मीचि एका । दत्तस्वरुपीं मीच मी देखा ॥४॥ एका जनार्दनीं दत्त पुढें मागें । सगुन निर्गुण रुपें लागला संगे ॥५॥