भजनी मालिका
← भजनांकडे परत

दरुशनें तरती प्राणी । ऐशी आयणी जयाची

darushanen tarati prani | aishi ayani jayachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दरुशनें तरती प्राणी । ऐशी आयणी जयाची ॥१॥ ठेवितांचि मस्तकी हात । देवाचि करीत तयासी ॥२॥ देउनी नाममात्रा रस । भवरोगास छेदिती ॥३॥ एका जनार्दनीं ते संत । कृपावंत दीनालागीं ॥४॥