भजनी मालिका
← भजनांकडे परत

दानधर्म कोणान घडे सर्वथा । राम नाम घेतं सर्व जोडें

danadharma konan ghade sarvatha | ram nam ghetan sarva joden

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दानधर्म कोणान घडे सर्वथा । राम नाम घेतं सर्व जोडें ॥१॥ कर्म धर्म कांहीं न होती सांग । रामनामें पांग फिटे त्याचा ॥२॥ वेदशास्त्रांव्युप्तत्ती पढतां श्रम पोटीं । रामनामें कोटी जप घडे ॥३॥ आचार विचार न कळे साचार । एका जनार्दनीं निर्धार राम जपा ॥४॥