भजनी मालिका
← भजनांकडे परत

दहा अवतार घेत भक्ताचियां काजा । तो हा विटेवरी राजा पंढरीचा

daha avatar ghet bhaktachiyan kaja | to ha vitevari raja pandharicha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दहा अवतार घेत भक्ताचियां काजा । तो हा विटेवरी राजा पंढरीचा ॥१॥ भक्तांचें उणें न पाहे आपण । उच्छिष्ट काढी धर्माघरीं न लाजे जाण ॥२॥ अर्जुनाची घोडीं रणांगणीं धुतली । भक्ति नये उणें कृपेची माउली ॥३॥ एका जनार्दनीं भक्तांचीया काजा । विटाएवरी उभा राहिला सहजा ॥४॥