भजनी मालिका
← भजनांकडे परत

चुंबळीशीं करी चुंबळीचा संग । अंगीं वसे रंग क्रियाहीन

chumbalishin kari chumbalicha sang | angin vase rang kriyahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चुंबळीशीं करी चुंबळीचा संग । अंगीं वसे रंग क्रियाहीन ॥१॥ बीजा ऐसें फळ दावी परिपाकीं । परिमळ लौकिकीं जाती ऐसा ॥ध्रु.॥ माकडाच्या गळां रत्न कुळांगना । सांडूनियां सुना बिदी धुंडी ॥२॥ तुका म्हणे ऐसा व्याली ते गाढवी । फजिती ते व्हावी आहे पुढें ॥३॥