भजनी मालिका
← भजनांकडे परत

चोखा चोखट निर्मळ

chokha chokhat nirmal

रचनाकार: संत बंका · अभंग
चोखा चोखट निर्मळ । तया अंगी नाही मळ ॥१॥ चोखा सुखाचा सागर । चोखाभक्तिचा आगर ॥२॥ चोखाप्रेमाची माउली । चोखा कृपेची साउली ॥३॥ चोखा मनाचें मोहन । वंका घाली लोटांगण ॥४॥