भजनी मालिका
← भजनांकडे परत

चित्तीं नाहीं आस । त्याचा पांडुरंग दास

chittin nahin as | tyacha pandurang das

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चित्तीं नाहीं आस । त्याचा पांडुरंग दास ॥१॥ असे भक्तांचिये घरीं । काम न सांगता करी ॥ध्रु.॥ अनाथाचा बंधु । असे अंगीं हा संबंधुं ॥२॥ तुका म्हणे भावें । देवा सत्ता राबवावें ॥३॥