भजनी मालिका
← भजनांकडे परत

चित्ताचा चाळक । त्याचें उभय सूत्र एक

chittacha chalak | tyachen ubhay sutra ek

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चित्ताचा चाळक । त्याचें उभय सूत्र एक ॥१॥ नाचवितें नानाछंदें । सुखें आपुल्या विनोदें ॥ध्रु.॥ चंद्र कमळणी । नाहीं धाडीत सांगोनि ॥२॥ तुका म्हणे उठी । लोह चुंबकाचे दृष्टी ॥३॥