भजनी मालिका
← भजनांकडे परत

चित्त तें चिंतन कल्पनेची धांव । जे जे वाढे हांव इंद्रियांची

chitta ten chintan kalpanechi dhanv | je je vadhe hanv indriyanchi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चित्त तें चिंतन कल्पनेची धांव । जे जे वाढे हांव इंद्रियांची ॥१॥ हात पाव दिसे शरीर चालतां । नावें भेद सत्ता जीवाची ते ॥ध्रु.॥ रवीचिये अंगीं प्रकाशक सकळा । वचनें निराळा भेद दिला ॥२॥ तुका म्हणे माप वचनाच्या अंगीं । सौख्य काय रंगीं निवडावें ॥३॥