भजनी मालिका
← भजनांकडे परत

चित्ता मिळे त्याचा संग रुचिकर । क्षोभवितां दूर तों चि भलें

chitta mile tyacha sang ruchikar | kshobhavitan dur ton chi bhalen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चित्ता मिळे त्याचा संग रुचिकर । क्षोभवितां दूर तों चि भलें ॥१॥ ऐसी परंपरा आलीसे चालत । भलत्याची नीत त्यागावरी ॥ध्रु.॥ हो कां पिता पुत्र बंधु कोणी तेही । विजाति संग्रहीं धरूं नये ॥२॥ तुका म्हणे सत्य पाळावें वचन । अन्यथा आपण करूं नये ॥३॥