भजनी मालिका
← भजनांकडे परत

चिंतीले पावलीं जयां कृष्णभेटी । एरवीं ते आटी वांयांविण

chintile pavalin jayan krushnabheti | eravin te ati vanyanvin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चिंतीले पावलीं जयां कृष्णभेटी । एरवीं ते आटी वांयांविण ॥१॥ वासना धरिती कृष्णाविणें कांहीं । सीण केला तिहीं साधनांचा ॥२॥ चाळविले डंबें एक अहंकारें । भोग जन्मांतरें न चुकती ॥३॥ न चुकती भोग तपें दानें व्रतें । एका त्या अनंतेंवांचूनियां॥४॥ चुकवुनि जन्म देईंल आपणा । भजा नारायण तुका म्हणे ॥५॥