भजनी मालिका
← भजनांकडे परत

चौर्‍यांयशीं भोगितां । दुःख न सरे सर्वथा । संतसमागम घडतां । दुःख नासे तात्काळ

chaur‍yanyashin bhogitan | duhkh na sare sarvatha | santasamagam ghadatan | duhkh nase tatkal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
चौर्‍यांयशीं भोगितां । दुःख न सरे सर्वथा । संतसमागम घडतां । दुःख नासे तात्काळ ॥१॥ नको गुतूं या संसारीं । पडसी काळाचे आहारीं । संतसमागम धरी । तैं यातना चुकती ॥२॥ मागें बहुतांचा उद्धार । संतीं केलासे साचार । तोचि हा धरी निर्धार । संतसंग सर्वदा ॥३॥ एका जनार्दनीं शरण । संतसंग सुलभ जाण । भोळ्याभाविकांक तारण । समागम संतांचा ॥४॥