भजनी मालिका
← भजनांकडे परत

चौ देहांचा पूर्णघट । त्याचा अवघा बोभाट

chau dehancha purnaghat | tyacha avagha bobhat

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
चौ देहांचा पूर्णघट । त्याचा अवघा बोभाट ॥१॥ माझें माझें म्हणती वेडे । घट भरला रिता फूडें ॥२॥ ऐसे भांबावले देहा । दिवसां नागविले पहा ॥३॥ एका जनार्दनीं पुर्ण घट । एक नांदे उघड प्रगट ॥४॥