भजनी मालिका
← भजनांकडे परत

चाले हें शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलवितें हरीविण

chale hen sharir konachiye satte | kon bolaviten harivin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चाले हें शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलवितें हरीविण ॥१॥ देखवी ऐकवी एक नारायण । तयाचें भजन चुकों नको ॥ध्रु.॥ मानसाची देव चालवी अहंता । मी चि एक कर्त्ता म्हणों नये ॥२॥ वृक्षाचीं हीं पानें हाले त्याची सत्ता । राहिली अहंता मग कोठें ॥३॥ तुका म्हणे विठो भरला सबाह्य । उणें काय आहे चराचरीं ॥४॥