भजनी मालिका
← भजनांकडे परत

बुडालिया जळीं धावतसे कोण । तैसे प्राणी जन बुडताती

budaliya jalin dhavatase kon | taise prani jan budatati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बुडालिया जळीं धावतसे कोण । तैसे प्राणी जन बुडताती ॥१॥ संसार हा डोहो दुस्तर पारखा । सांगड ती देखा रामनाम ॥२॥ एका जनार्दनीं संतांचा आधार । उतरूं पैलपार भवडोहीं ॥३॥