भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रिदावळी ज्याचे रुळते चरणीं । पाउलें मेदिनी सुखावे त्या

bridavali jyache rulate charanin | paulen medini sukhave tya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ब्रिदावळी ज्याचे रुळते चरणीं । पाउलें मेदिनी सुखावे त्या ॥१॥ सुखावे मेदिनी कृष्णाचिये चालीं । कुंकुमें शोभलीं होय रेखा ॥२॥ होउनि भ्रमर पाउलांचें सुख । घेती भक्त मुख लावूनियां ॥३॥ याचसाठी धरियेला अवतार । सुख दिलें फार निजदासां ॥४॥ निज सुख तुका म्हणे भक्तां ठावें । तींहीं च जाणावें भोगूं त्यासि ॥५॥