भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रीद ज्याचें जगदानी । तोचि मनीं स्मरावा

brid jyachen jagadani | tochi manin smarava

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ब्रीद ज्याचें जगदानी । तोचि मनीं स्मरावा ॥१॥ सम पाय कर कटी । उभा तटीं भींवरेच्या ॥ध्रु.॥ पाहिलिया वेध लावी । बैसे जीवीं जडोनि ॥२॥ तुका म्हणे भक्तिकाजा । धांवें लाजा लवलाहें ॥३॥