भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रम्हरसगोडी तयांसी फावली । वासना निमाली समूळ ज्यांची

bramharasagodi tayansi phavali | vasana nimali samul jyanchi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ब्रम्हरसगोडी तयांसी फावली । वासना निमाली समूळ ज्यांची ॥१॥ नाहीं त्या विटाळ अखंड सोंवळीं । उपाधीवेगळीं जाणिवेच्या ॥ध्रु.॥ मन हें निश्चळ जालें एके ठायीं । तयां उणें काई निजसुखा ॥२॥ तोचि पुण्यवंतें परउपकारी । प्रबोधी त्या नारीनरलोकां ॥३॥ तुका म्हणे त्यांचे पायीं पायपोस । होऊनियां वास करिन तेथें ॥४॥