भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रम्हरस घेई काढा । जेणें पीडा वारेल

bramharas ghei kadha | jenen pida varel

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ब्रम्हरस घेई काढा । जेणें पीडा वारेल ॥१॥ पथ्य नाम विठोबाचें । अणीक वाचे न सेवीं ॥ध्रु.॥ भवरोगाऐसें जाय । आणीक काय क्षुल्लकें ॥२॥ तुका म्हणे नव्हे बाधा । अणीक कदा भूतांची ॥३॥