भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्राम्हण तो याती अंत्यज असतां । मानावा तत्वता निश्चयेसी

bramhan to yati antyaj asatan | manava tatvata nishchayesi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ब्राम्हण तो याती अंत्यज असतां । मानावा तत्वता निश्चयेसी ॥१॥ रामकृष्णें नाम उच्चारी सरळें । आठवी सांवळें रूप मनीं ॥ध्रु.॥ शांति क्षमा दया अलंकार अंगीं । अभंग प्रसंगीं धैर्यवंत ॥२॥ तुका म्हणे गेल्या षडऊर्मी अंगें । सांडुनियां मग ब्राह्मण तो ॥३॥