भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रह्मी स्फुरें जें स्फुरण शुद्ध सत्त्वाचें लक्षंण । तो तूं लक्षी लक्ष्यातीत परिपुर्ण रे

brahmi sphuren jen sphuran shuddha sattvachen lakshann | to tun lakshi lakshyatit paripurna re

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ब्रह्मी स्फुरें जें स्फुरण शुद्ध सत्त्वाचें लक्षंण । तो तूं लक्षी लक्ष्यातीत परिपुर्ण रे ॥१॥ कान्हु सच्चिदानंदु शब्द अरुता रे । त्याही परता तुं निजानंदु रे ॥२॥ जेथें नाहीं गुणागुण नाहीं कायासी कारण । तो तुं गुणा गुणातीत परिपुर्न रे ॥३॥ एकाएकीं जनार्दन वेद भाष्य वचन । तो तुं शब्दादी गिळुन राहिलासी रे ॥४॥