भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्राह्मणाचें तीर्थ घेतां त्रास मोठा । प्रेमें पितो घोटा घटघटा

brahmanachen tirtha ghetan tras motha | premen pito ghota ghataghata

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ब्राह्मणाचें तीर्थ घेतां त्रास मोठा । प्रेमें पितो घोटा घटघटा ॥१॥ हातें मोर्‍या उपशी कष्ट करी नाना । देवाच्या पूजना कंटाळतो ॥२॥ गाईस देखुनी बदबदा मारी । घोड्याची चाकरी गोड वाटे ॥३॥ एका जनार्दनीं ऐसें झाले प्राणी । जन्मोनियां जनीं व्यर्थ आले ॥४॥