भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रह्माज्ञानी वाचें सांगतां नये । जैं कृपा होये श्रीगुरुची

brahmadnyani vachen sangatan naye | jain krupa hoye shriguruchi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ब्रह्माज्ञानी वाचें सांगतां नये । जैं कृपा होये श्रीगुरुची ॥१॥ लाभेल लाभेल ब्रह्माज्ञान क्षणीं । वाउगी कहाणी बोलुनी काय ॥२॥ हृदयींचा बोध ठसतां अंतरीं । कामक्रोध वैरी पळताती ॥३॥ तैसें ब्रह्माज्ञान कळलियावरी । सर्वभावें वैखरी गुण वाणी ॥४॥ एका जनार्दनीं वंदूं गुरुपाय । आणीक उपाय नाहीं नाहीं. ॥५॥