भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रह्माज्ञानाची कसवटी । अनुभव नाहीं पोटीं । बोला चावटी । वाउगी बापा

brahmadnyanachi kasavati | anubhav nahin potin | bola chavati | vaugi bapa

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ब्रह्माज्ञानाची कसवटी । अनुभव नाहीं पोटीं । बोला चावटी । वाउगी बापा ॥१॥ शुद्ध ब्रह्माज्ञान । एक आत्मा भूतमात्रीं प्रमाण । विनोदें छळण । कवणाचें न करीं ॥२॥ जीव शिवा नाहीं भेद । अवघा नित्य परमानंद । आनंदाचा कंद तोचि ब्रह्माज्ञानीं ॥३॥ एका जनार्दनीं वर्म । भाविकांसी सुधर्म । अभाविकासी भ्रम । जाणीवेचा ॥४॥