भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रह्मादिक वेडे जयासाठीं होती । तो गोकुळी श्रीपती लोणी चोरी

brahmadik vede jayasathin hoti | to gokuli shripati loni chori

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ब्रह्मादिक वेडे जयासाठीं होती । तो गोकुळी श्रीपती लोणी चोरी ॥१॥ कवाड ते जैसें आहे तैशापरी । येतो जातो हरी न कळेचे ॥२॥ पाळती पाहतां ब्रह्मांड सकळ । तयाचा प्रतिकाळ करीतसे ॥३॥ एका जनार्दनीं चोरीचें तेंमीस । हरित सारांश नवनीत ॥४॥