भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रह्मादिक देव त्यांचें रंगीं नाचती । सनकादिक त्याचें ध्रुपद धरिती

brahmadik dev tyanchen rangin nachati | sanakadik tyachen dhrupad dhariti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ब्रह्मादिक देव त्यांचें रंगीं नाचती । सनकादिक त्याचें ध्रुपद धरिती ॥१॥ त्यापुढें गीत नृत्य करिती । त्यापुढें मानव केवीं ताल धरिती ॥२॥ हरि हरि हरि म्हणतां वाचे । हरिरंगीं नाचे तोचि धन्य ॥३॥ शास्त्राची व्युप्तत्ती प्रसन्न वागेश्वरी । ती सारजा मुख्य करी नृत्य तेथें ॥४॥ शास्त्र अभिमानें चढला ताठा । मुक्ति ते फुकटा अंतराले ॥५॥ एका जनार्दनीं स्वहितीं तूं नाचे । बोलणें अभावाचें बोलुं नको ॥६॥