भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रह्माचारी म्हणती महंत । सदा विषयावरी चित्त

brahmachari mhanati mahant | sada vishayavari chitta

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ब्रह्माचारी म्हणती महंत । सदा विषयावरी चित्त ॥१॥ नेसोनियां कौपीन । अंतरीं तों विषयध्यान ॥२॥ बोले जैसा रसाळ । भाव अंतरीं अमंगळ ॥३॥ एका जनार्दनीं सोंग । तया न मिळे संतसंग ॥४॥