भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रह्मा जाणे ब्राह्मण याती । त्याची घडावी संगती

brahma jane brahman yati | tyachi ghadavi sangati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ब्रह्मा जाणे ब्राह्मण याती । त्याची घडावी संगती ॥१॥ ब्राह्मण तयासी म्हणावे । त्याचे पायीं लीन व्हावें ॥२॥ गळां घालोनि सूत्रदोरी । म्हणविती ब्रह्माचारी ॥३॥ परी ब्रह्मा नाहीं ठावें । लोकां सांगतसे भावें ॥४॥ एका जनार्दनीं पूर्ण । ब्रह्मा जाणे तो ब्राह्मण ॥५॥