भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रह्मा एक परिपूर्ण । तेथें नाहीं दोष गुण

brahma ek paripurna | tethen nahin dosh gun

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ब्रह्मा एक परिपूर्ण । तेथें नाहीं दोष गुण ॥१॥ पराचा देखती जे दोष । तेचि दोषी महादोषी ॥२॥ ब्रह्मीं नाहें दोष गुण । पाहती ते मुर्ख जाण ॥३॥ जे गुणदोषी देखती । एका जनार्दनीं नाडती ॥४॥