भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलोनियां दाऊंकां तुह्मी नेणा जी देवा

boloniyan daunkan tuhmi nena ji deva

बोलोनियां दाऊंकां तुह्मी नेणा जी देवा । ठेवाल तें ठेवा ठायीं तैसा राहेन ॥१॥ पांगुळलें मन कांहीं नाठवे उपाय । म्हणऊनि पाय जीवीं धरूनि राहिलों ॥ध्रु.॥ त्यागें भोगें दुःख काय सांडावें मांडावें । ऐसी धरियेली जीवें माझ्या थोरी आशंका ॥२॥ तुका म्हणे माता बाळा चुकलिया वनीं । न पवतां जननी दुःख पावे विठ्ठले ॥३॥