भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलविले जेणें । तोचि याचें गुह्य जाणे

bolavile jenen | tochi yachen guhya jane

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बोलविले जेणें । तोचि याचें गुह्य जाणे ॥१॥ मी तों काबाडाचा धनी । जेवूं मागावें थिंकोनि ॥ध्रु.॥ मजुराच्या हातें । माप जालें गेलें रितें ॥२॥ जाला पुरविता । पांडुरंग माझा पिता ॥३॥ मायबापासवें । बाळें कौतुकें खेळावें ॥४॥ जैसा करिती धंदा । तैसा पडोनियां छंदा ॥५॥ त्याच्या साच गाई ह्मैसी । येणें खेळावें मातीसी ॥६॥ तुका म्हणे बोल । माझा बोलतो विठ्ठल ॥७॥