भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलतां वचन असा पाठमोरे । मज भाव बरे कळों आले

bolatan vachan asa pathamore | maj bhav bare kalon ale

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बोलतां वचन असा पाठमोरे । मज भाव बरे कळों आले ॥१॥ मागतिलें नये अरुचीनें हातां । नाहीं वरी सत्ता आदराची॥ध्रु.॥ समाधानासाटीं लाविलासे कान । चोरलें तें मन दिसतसां ॥२॥ तुका म्हणे आम्हां तुमचे चि फंद । वरदळ छंद कळों येती ॥३॥