भजनी मालिका
← भजनांकडे परत

भूतीं भगवद्भाव । मात्रासहित जीव । अद्वैत ठाव । निरंजन एकला

bhutin bhagavadbhav | matrasahit jiv | advait thav | niranjan ekala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भूतीं भगवद्भाव । मात्रासहित जीव । अद्वैत ठाव । निरंजन एकला ॥१॥ ऐसीं गर्जती पुराणें । वेदवाणी सकळ जन । संत गर्जतील तेणें । अनुभवें निर्भर ॥ध्रु.॥ माझें तुझें हा विकार । निरसतां एकंकार । न लगे कांहीं फार । विचार चि करणें ॥२॥ तुका म्हणे दुजें । हें तों नाहीं सहजें । संकल्पाच्या काजें । आपें आप वाढलें ॥३॥