भजनी मालिका
← भजनांकडे परत

भूत भविष्य कळों येईल वर्तमान । हें तों भाग्यहीन त्यांची जोडी

bhut bhavishya kalon yeil vartaman | hen ton bhagyahin tyanchi jodi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भूत भविष्य कळों येईल वर्तमान । हें तों भाग्यहीन त्यांची जोडी ॥१॥ आह्मीं विष्णुदासीं देव ध्यावा चित्तें । होणार तें होतें प्रारब्धेंचि ॥ध्रु.॥ जगरूढीसाठी घातलें दुकान । जातो नारायण अंतरोनि ॥२॥ तुका म्हणे हा हो प्रपंच गाढा । थोरली ते पीडा रिद्धीसिद्धी ॥३॥