भजनी मालिका
← भजनांकडे परत

भूमीवरी कोण ऐसा । गांजूं शके हरीच्या दासा

bhumivari kon aisa | ganjun shake harichya dasa

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भूमीवरी कोण ऐसा । गांजूं शके हरीच्या दासा ॥१॥ सुखें नाचा हो कीर्त्तनीं । जयजयकारें गर्जा वाणी ॥ध्रु.॥ काळा सुटे पळ । जाती दुरितें सकळ ॥२॥ तुका म्हणे चित्तीं । सांगूं मानाची हे निति ॥३॥