भजनी मालिका
← भजनांकडे परत

भुलविला राजा लावण्याच्या तेजें । नेम व्रतराज खोळंबिला

bhulavila raja lavanyachya tejen | nem vrataraj kholambila

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भुलविला राजा लावण्याच्या तेजें । नेम व्रतराज खोळंबिला ॥१॥ राजपत्नीपुत्र नाम धर्मांगद । चालवी सुबुध्द एकादशी ॥२॥ बहुदिन होतां न कळे रायासी । मोहोनियां पाशीं बांधियेला ॥३॥ पुढें आली जाणा तेव्हां हरिदिनीं । लोकांलागीं राणी सांगताहे ॥४॥ धेंडा पिटविला श्रीहरि जागरु । करा निरंतरु निजूं नका ॥५॥ एका जनार्दनी नृपें ऎकिलें कानीं । धिग म्हणोनि प्राणी जन्मा आलों ॥६॥