भजनी मालिका
← भजनांकडे परत

भुललें ते प्राणी विसरले कीर्तना । अंतीं त्या पतना वारी कोण

bhulalen te prani visarale kirtana | antin tya patana vari kon

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भुललें ते प्राणी विसरले कीर्तना । अंतीं त्या पतना वारी कोण ॥१॥ जयांसी नावडे हरींचें किर्तन । ते जाणावे पाषाण कलीमाजीं ॥२॥ मागें सांगितलें संतीं अनुभवुनी । तयावया जनीं किर्तन नौका ॥३॥ एका जनार्दनीं सारांचें हें सार । कीर्तने भवपार मॄत्युलोकीं ॥४॥